WIP project 82 control room

work in progress, project 82 short film, 3d model of a control room.

Artist : Shivraj

 

Advertisements

Article 2 Published in ‘Sakal’ on 19 NOV 2004

Hello all,

Following is my second article which was published in ‘Sakal’s Appointments supplement on Tue, 19th Nov 2004. (‘Sakal’ is a popular Marathi daily newspaper). I had a very huge response from readers of Sakal from Pune. (see also – the first article published in Nov 2003)

सकाळ दैनिक – १९ नोव्हेंबर २००४

कॉम्प्युटर ग्राफिक्स, थ्रीडी अॅनिमेशन

कॉम्प्युटर ग्राफिक्स, थ्रीडी कॉम्प्युटर ग्राफिक्सचा (थ्रीडीसीजी) वापर कुठे आणि कसा होऊ शकतो, हा प्रश्नच आता कदाचित विचित्र ठरेल. कारण गेल्या काही वर्षांपासून थ्रीडी मॉडेलिंग व अॅनिमेशन करणारी सॉफ्टवेअर्सही पूर्वीपेक्षा अनेक बाबतीत विकसित व अधिकाधिक प्रगल्भ झाली आहेत, अनेक नवी सोपी टूल्स व संकल्पना शोधल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा सॉफ्टवेअर्सचा वापर अमर्यादपणे कुठल्याही क्षेत्रासाठी केला जात आहे.

आजमितीला अनेक मोठे वाहन उद्योग, कारखाने व त्यांना सेव पुरवणारे लघुउद्योग इत्यादींना त्यांनी केलेल्या उत्पादनाची तसेच कारखान्याची जाहिरात करण्यासाठी व तांत्रिक माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विविध माध्यमांची गरज असते. यासाठी माहितीपत्रके, आलेख, व्हिडिओ शूटिंग इत्यादी माध्यमांचा वापर व्यापक आहे; पण गेल्या काही वर्षांपासून थ्रीडीसीजी व अॅनिमेशनचा वापर करण्याकडे या कंपन्यांचा काल वाढत आहे. अॅनिमेशन तंत्रामुळे अशी माहिती ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकते. या तंत्रातील अचूकता, वास्तववादीपणा व उच्च तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींमुळे बऱ्याच कंपन्या तांत्रिक अभ्यास करण्यासाठी व प्रसारमाध्यम म्हणून अॅनिमेशन तंत्र अवलंबून घेण्याच्या विचारात आहेत.

Continue reading

Article Published in ‘Sakal’ – 18 Nov 2003

Hello all,

Following is my first article which was published in ‘Sakal’s Appointments supplement on Tue, 18th Nov 2003. (‘Sakal’ is a popular Marathi daily newspaper). I had a very huge response from readers of Sakal from Pune and Aurangabad after it got published. Thanks to Sakal Newspaper group. Thanks to ‘Horizon Graphics’ with whom I was working at that time. And also thanks to Mrs. Bhagyashri Garud for making a typed version of this article.

see also: English Version of this article and The second article published

Image of actual news paper page

दैनिक सकाळ, पुणे, दि. १८ नोव्हेंबर २००३

कॉम्पुटर ग्राफिक्स ३ डी अॅनिमेशन

जगभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक, औद्योगिक उलाढाल घडवून आणणार्‍या; तसेच अनेक कलाकारांसाठी एक नवी ज्ञानशाखा व उत्पन्नाचे नवे साधन ठरलेल्या, कॉम्प्युटर ग्राफिक्स क्षेत्राच्या 3D Animation शाखेविषयी.

 

‘द लायन किंग’, ‘टारझन’, टॉम अँड जेरी’, ‘टॉय स्टोरी’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘स्टार वॉर्स’, ‘द ममी’… हुशऽऽऽ… ही यादी न संपणारी आहे! दर्शकांना थक्क करून सोडणाऱ्या या सर्व कलाकृतींच्या मागे काय होते? एकच गोष्ट, ती म्हणजे अनेक कलाकारांची कमाल. वरील सर्व उदाहरणात एक मुख्य तंत्रज्ञान वापरले जाते, ते म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक्स (CG). त्याचा वापर करून हे कलाकार अनेक अशक्यप्राय गोष्टी आपल्याला दाखवतात. माहिती तंत्रज्ञानाच्या, या युगात लोकांच्या ह्रदयापर्यंत पोचणारे हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलेले आहे. अर्थात या तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजन किंवा करमणुकीपुरता न राहता शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, जाहिरात, इंटरनेट, केसस्टडी, गेम डेव्हेलपमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.

कॉम्प्युटर ग्राफिक्स हे दुसरे तिसरे काही नसून, कागदावर चित्रे काढणे, विविध वस्तूंच्या कागद, पुठ्ठा इ. माध्यमांचा वापर करून प्रतिकृती तयार करणे, अशाच कलांची पुढची पायरी आहे. येथे संगणक हा फक्त मदतीपुरता असतो. त्यामुळे मेहनत करावीच लागते. या तंत्रज्ञानाचे वर्गीकरण पुढील काही प्रकारात करता येईल. १) ड्रॉइंग व पेंटिंग, २) इमेज/व्हिडिओ एडिटिंग, ३) 2D अॅनिमेशन, ४) वेब डिझायनिंग, DTP इ., ५) 3D मॉडेलिंग, अॅनिमेशन, ६) सिम्युलेशन व अॅनॅलिसीस, ७) पोस्ट प्रॉडक्शन व कंपोझिटिंग टेक्निक्स इ.

येथे गरजेनुसार वरील विविध तंत्रांचा योग्य प्रकारे वापर करणे हे वापरकर्त्याचे (USER) कसब असते. तंत्र हाताळण्याच्या पद्धतीनुसार द्विमितीय (2 Dimensional) व त्रिमितीय (3 Dimensional) असे दोन मुख्य प्रकार पडतात. 2D ग्राफिक्स व 2D अॅनिमेशन यांबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध असल्यामुळे येथे आपण फक्त 3D तंत्रज्ञानाचा विचार करणार आहोत. त्यात त्रिमिती, 3DCG, मॉडेलिंग, अॅनिमेशन व त्याचा वापर इ. क्रमाक्रमाने पाहू या.

Continue reading