Article 2 Published in ‘Sakal’ on 19 NOV 2004


Hello all,

Following is my second article which was published in ‘Sakal’s Appointments supplement on Tue, 19th Nov 2004. (‘Sakal’ is a popular Marathi daily newspaper). I had a very huge response from readers of Sakal from Pune. (see also – the first article published in Nov 2003)

सकाळ दैनिक – १९ नोव्हेंबर २००४

कॉम्प्युटर ग्राफिक्स, थ्रीडी अॅनिमेशन

कॉम्प्युटर ग्राफिक्स, थ्रीडी कॉम्प्युटर ग्राफिक्सचा (थ्रीडीसीजी) वापर कुठे आणि कसा होऊ शकतो, हा प्रश्नच आता कदाचित विचित्र ठरेल. कारण गेल्या काही वर्षांपासून थ्रीडी मॉडेलिंग व अॅनिमेशन करणारी सॉफ्टवेअर्सही पूर्वीपेक्षा अनेक बाबतीत विकसित व अधिकाधिक प्रगल्भ झाली आहेत, अनेक नवी सोपी टूल्स व संकल्पना शोधल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा सॉफ्टवेअर्सचा वापर अमर्यादपणे कुठल्याही क्षेत्रासाठी केला जात आहे.

आजमितीला अनेक मोठे वाहन उद्योग, कारखाने व त्यांना सेव पुरवणारे लघुउद्योग इत्यादींना त्यांनी केलेल्या उत्पादनाची तसेच कारखान्याची जाहिरात करण्यासाठी व तांत्रिक माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विविध माध्यमांची गरज असते. यासाठी माहितीपत्रके, आलेख, व्हिडिओ शूटिंग इत्यादी माध्यमांचा वापर व्यापक आहे; पण गेल्या काही वर्षांपासून थ्रीडीसीजी व अॅनिमेशनचा वापर करण्याकडे या कंपन्यांचा काल वाढत आहे. अॅनिमेशन तंत्रामुळे अशी माहिती ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकते. या तंत्रातील अचूकता, वास्तववादीपणा व उच्च तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींमुळे बऱ्याच कंपन्या तांत्रिक अभ्यास करण्यासाठी व प्रसारमाध्यम म्हणून अॅनिमेशन तंत्र अवलंबून घेण्याच्या विचारात आहेत.

अशा कंपन्यांच्या वाढत्या मागणीमुळे अॅनिमेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी थ्रीडीसीजी वापरताना सामान्य अॅनिमेटरपेक्षा इंजिनिअरींग इत्यादी क्षेत्रांतील व्यक्ती अॅनिमेशन शिकून चांगले काम करू शकतात. त्यामुळे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरींग अगदी पदविका झालेल्यांपासून बी.ई. झालेले विद्यार्थी त्यांच्याकडील तांत्रिक ज्ञानाचा योग्य वापर करून घेऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी थ्रीडी अॅनिमेशन क्षेत्राचे शिक्षण घेतल्यास कॅड/कॅमप्रमाणेच येथेही प्रचंड संधी तयार झालेल्या आहेत. डिप्लोमा किंवा डिग्रीला प्रवेश घेण्यापूर्वीही म्हणजे दहावी, बारावीनंतरही पुढील शिक्षणास पूरक म्हणून कॉम्प्युटर ग्राफिक्स व अॅनिमेशनकडे वळणे योग्य ठरू शकते. डिप्लोमा व डिग्रीचे विद्यार्थी अॅनिमेशनचा वापर प्रोजेक्ट रिपोर्ट व प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी उत्तम करू शकतात.

आर्किटेक्चर, मेकॅनिकल इत्यादींच्या अभ्यासक्रमांतील अनेक घटक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात Slide Show, Charts, O.H.P., Site Visits इत्यादींप्रमाणेच अॅनिमेशन हे अत्यंत प्रभावी व योग्य माध्यम ठरत आहे.

उदा. : object drawing, solid geometry, concepts, of orthographic, perspective drawing पासून ते types of structures, simple/ complex mechanigms व robotics अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे अॅनिमेशनमुळे शक्य होते. त्यामुळे विद्यापीठे तसेच इंजिनिअरिंग/ आर्किटेक्चरल कॉलेजेस इत्यादींनी या क्षेत्राकडे वळण्यास वाव आहे.

मागील काही वर्षांत थ्रीडीसीजीचा वापर प्रामुख्याने फिल्म व टीव्ही प्रोग्रॅम्ससाठी केला जात होता, तोच आज शिक्षण क्षेत्र, जाहिरात व विविध प्रकारचे डिझायनिंग इत्यादींसाठीही प्रचंड प्रमाणात केला जात आहे. सोबतच्या तक्त्यामध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्सचा व अॅनिमेशनचा वापर गेल्या तीन ते चार वर्षांत कसा झाला, ते दाखवले आहे.

कॉम्प्युटर ग्राफिक्स क्षेत्रातील उलाढाल, इतर क्षेत्रांच्या बाबतीत विचारात घेतली तर आशिया/ पॅसिफिक खंडातील देशांचा वाटा तब्बल ३० टक्के होता. हा वाटा येत्या ८ ते १० वर्षात दुप्पट होण्याची शक्यता अनेक तज्ञ वर्तवित आहेत व भारतासारख्या देशात तशी चिन्हेही दिसत आहेत.

या सर्व आकडेवारीवरून एवढे निश्चित समजते, की येत्या ३ ते ४ वर्षांत भारतात थ्रीडी कॉम्प्युटर ग्राफिक्स क्षेत्रात प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. भारतीय लीकांकाडील कला, चिकाटी इत्यादी गुणांमुळेच देशाबाहेरील अनेक कंपन्या भरतात कामे पाठवत आहेत व भारत एक मोठी बाजारपेठ ठरत आहे. पण अर्थातच योग्य वेळी, योग्य व्यक्तींकडून पूर्ण शिक्षण झालेले उमेदवारच या संधीचा जास्त लाभ उठवू शकतील.

महेश रमेश देशपांडे, पुणे

Advertisements

2 thoughts on “Article 2 Published in ‘Sakal’ on 19 NOV 2004

  1. Pingback: Article Published in ‘Sakal’ – 18 Nov 2003 | mahesh deshpande

  2. Pingback: प्रस्तावना | Advaita Studios

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s